Arushi

Tuesday, August 29, 2006

पाऊस

काल आईशी फोनवर बोलण झाल. ती आत्ताच कोकणात गावी जावुन आली. कोकण updates चा episode झाला. अग जोश्यान्कडे मागच्या महीन्यात शिल्पाची मन्गळागौर झाली...नुकतेच पार पडलेले हरतालिका आणि गणपती स्थापनाबद्दल बोलण्यात अर्धा तास कसा गेला कळलच नाही. फोन खाली ठेवला आणि खिडकीत उभी राहुन मी बाहेरचा पाऊस बघत होते. त्या पावसने अचानक मला कोकणातले दिवस आठवले. मन भुतकाळात कधी गेले कळलेच नाही. माझे बालपण कोकणामधले...अचानक मन्गळागौर आठवली...आम्ही मुली सकाळी लवकर उठुन वेग वेगळ्या तर्हेचि फ़ुले गोळा करत असु. बरोबर पत्रि पण म्हणजे वेग वेगळ्या झाडाची पाने. मग ज्याच्यकडे पुजा असेल तिथे सगळ्या नविन लग्न झलेल्या बायका जमत. आम्ही कुमरिका पण त्या घोळक्यात शामिल होत असु...मग बायका मन्गळागौर पुजत. दुपारी जेवणाचा कार्यक्रम असे आणी मग रात्री पर्यन्त आराम. रात्री जेवण झाले की मग मन्गळागौर जागवयची...काय मज्जा यायची म्हणुन सान्गु...फ़ुगड्या, गाणी, झिम्मा घर नुसत दणाणुन जात असे....

नाच ग घुमा, कशी मी नाचु...
झिम पोरि झिम कपाळाच्य भिम...
आई मी येवु का..नको रे सोन्या...
Well I still remember some of it....
मग पहाटे पर्यन्त मन्गळागौर जागवायची आणि मग तिथेच पडवी ओसरीवर झोपुन जायच.....

हरतालीका: बर हा सण तर कुमरीकान्साठी सुद्धा असायचा. चान्गला नवरा मिळावा म्हणुन हरतालिका पुजत असु...पहाटे ४ वाजता उठुन, केस धुवुन, नविन कपडे घालुन आम्ही बापट काकुन्कडे जमायचो. मग भटजी आले की सर्वजणी मिळुन हरतालिका पुजन सुरु व्हायचे....त्य दिवशी पुर्ण दिवस उपवास असायचा. पूजा झाली की मस्त साबुदाणा खिचडी, राजगीरा लाडु आणी चहा मिळायचा. आजही ती चव माझ्या जिभेवर रेन्गाळत आहे....

दुसरया दिवशी गणेश पुजन. सकाळी ६ वाजता सर्वजण आन्घोळी करुन तयार होवुन पागेवर गणपति आणायला जायचो. मामा गणपतीचि पूजा करत असे आणी मग वाजत गाजत गणपति रिक्शा -
गाडीतुन घरी येत असे. बरोबर २५ जणान्चि यात्रा. नाच गाणी..गणपति बप्पा मोरयाच्या आरोळ्या...गणपति घरी आल्यावर त्याची स्थापना मग आरती. छोटे गाव असल्याने सगळे जण groupने आरती करायचे. पहीले जोश्यान्चे घर, मग बापट काकु, मग सावरकर काका असे करत १० घर तरी व्हायची. सुखकर्ता दुखहर्ता ने जी सुरवात व्हायची..मग लवथवति विक्राळा...येयी वो विठ्ठले माझे माउलि ये...ह्या आरती मधे तर तान लावताना अशी मज्जा यायची आणी मग त्यात मन्डळी २ भागात विभागली जायची...मग कोण खुप वेळ तान ओढुन धरतोय त्याची स्पर्धा. शेवट घालिन लोटान्गण आणी मन्त्रपुष्पान्जलि ने व्हायचा...ढोल, झान्झानचा आवाज़ कानात घुमु लागला...

आज अमेरिकेत सर्व सुख आहेत पण हे सर्व कुठे तरी सोडुन आल्याची फ़ारच खन्त आहे...एका पावसाच्या सरीने एवढ्या आठवणी जाग्या झाल्या....ये रे ये रे पावसाचा आज नविनच अर्थ कळला...

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा....
पैसा झाला खोटा, पावुस आला मोठा....
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी....
सर आली धावुन, मडके गेले वाहुन....

हो आज मझ्याकडे dollars आहेत पण ह्या गोड गोष्टीन्चे मडके कुठे तरी वाहुन गेले आहे......

Tuesday, July 25, 2006

खुप दिवस मनात होते की आपणही काही लिहाव. इथले काही लेख वाचले आणि अस वाटले की खुप दिवसानी जुने मित्र मैत्रिण भेटले. लेख वाचुन फ़ारच आनन्द झाला. मला अजुनही आठवते पहीला लेख वाचला ट्युलिपचा...आणि मग अजुन लेख वाचत गेले आणि अक्षरश: दोन तास कसे गेले ते कळलच नाही. Just felt like I discovered new myself....शाळेत असल्यापासुन डायरी लिहायची सवय होती. कौलेज सुरु झाल्यापासुन लिखाण थोडे कमीच झाले. कौलेजच्या शेवट्च्या वर्षी अश्या काही घटना घड्ल्या :) की पुन्हा डायरीकडे धाव घेतली. धाव तेव्हा संपली जेव्हा डायरी बाबान्च्या हाती पडली.. ते म्हणाले फ़ारच छान लिहील आहे :)) तसही डायरीमधे बौयफ़्रेड बद्दल कमी आणि त्याच्या आईबद्दल जास्त माहीती होती ..ही ही ...असो त्या नात्याप्रमाणे डायरीचाही सहवास सुटला. गेले काही वर्ष अमेरीकेत राहुन काहीतरी मागे राहुन गेल्याची फ़ारच खन्त होती...Infact अजुनही आहे. तर ईथे आपले विचार माण्डण्याचा एक प्रामणिक प्रयत्न. Hope I continue writing on this blog and present something good. Thanks for reading this and hope I get along with typing in marathi soon.